वर्गशिक्षकानेच फासला शिक्षकी पेशाला काळिमा, अल्पवयीन विद्यार्थिनिसोबत केले अश्लील चाळे

शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या एका वर्गशिक्षकानेच शिक्षकी पेशाला काळिमा फासल्याची घटना हडपसरमधील नावाजलेल्या शाळेत घडली आहे. याप्रकरणी संजय आत्माराम साळुंके (वय 45, रा. महंमदवाडी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 14 वर्षीय मुलीने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील माळवाडीमध्ये एका नावाजलेल्या शाळेत नोव्हेंबर 2019 मध्ये फिर्यादी मुलगी सहावीमध्ये शिक्षण घेत होती. त्यावेळी तिचे वर्गशिक्षक संजय साळुके याने सहलीदरम्यान मुलीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वर्गात अल्पवयीन मुलींकडे घाणेरड्या नजरेने पाहणे, कारण नसताना जवळ बोलाविणे असे प्रकार करीत विनयभंग केला. त्याशिवाय शाळेतील इतर मुलींनाही अशाच प्रकारची वागणूक देत विनयभंग केला आहे. याप्रकरणी शिक्षिकाविरूद्ध विनयभंग आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या