पुण्यात 50 पेक्षा अधिक घरफोड्या केलेल्या सराईताला बेड्या, चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सराफालाही अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील विविध भागात घरफोडी करीत तब्बल 50 पेक्षा जास्त गुन्हे केलेल्या सराईताला युनीट तीनने हडपसरमधून अटक केली. त्याच्याकडून तीन लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मोक्का गुन्ह्यात एक वर्षांपासून तो फरार होता. त्याच्याकडून दागिन्यांची खरेदी केल्याप्रकरणी सराफालाही अटक करण्यात आली आहे. गोरखसिंग गागसिंग टाक (वय – 35, रा. बिराजदार नगर, हडपसर) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.

घरफोडी करणारा सराईत आणि मोक्का गुन्ह्यात एक वर्षांपासून फरार असलेला हडपसर परिसरात आल्याची माहिती युनीट तीनला मिळाली होती. पथकाने सापळा रचून गोरखसिंगला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पुण्यात घरफोडी चोरलेले दागिने नाशिकमधील सोनार वैâलास नागरे याला विकल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने नाशिकमधून सोनाराला अटक केली. आरोपी गोरखसिंगन दोन साथीदारांसह मिळून घरफोडी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, शरद वाकसे, किरण पवार, सुजीत पवार, संजिव कळंबे, प्रकाश कटटे, ज्ञानेश्वर चित्ते, दिपक क्षिरसागर, गणेश शिंदे, साईनाथ पाटील, सतिश कत्रांळे, प्रताप पडवळ, राकेश टेकावडे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांनी केली.

50 पेक्षा जास्त घरफोडी अन मोक्कात फरार

सराईत गोरखसिंग टाकला एप्रिल 2021 मध्ये दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. त्याशिवाय कोथरूड पोलीस ठाण्यातंर्गत मोक्काच्या गुन्हयामध्ये तो एक वर्षापासून फरार होता. त्याच्याविरूद्ध शहरामध्ये घरफोडीचे 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे. तडीपार असताना नाशिकमध्ये राहण्यास असताना त्याने त्याठिकाणी सात ठिकाणी घरफोडी केल्याचे उघडकीस आले.

”घरफोडी करणारा सराईत हडपसर परिसरात आल्याची माहित मिळताच, पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, मोक्का गुन्ह्यात फरार असताना त्याने नाशिकमध्येही घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे.”

अनिता मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनीट तीन