पुणे – बोपदेव घाटात दुचाकीस्वार तरूणाला लुटले, आठजणांच्या टोळक्याचा शोध सुरु

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

बोपदेव घाटात तीन दुचाकीवरुन आलेल्या आठ चोरट्यांनी तरूणाला अडवून 1 लाख 35 हजारांची पिशवी चोरून नेली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली असून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विकास दरेकर (वय 35, रा. कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास हे कोंढवा बुद्रुक परिसरात राहायला आहेत. काल रात्री ते दुचाकीवर हिवरे गावातून घरी जात होते. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बोपदेव घाटात आल्यानंतर अचानक तीन दुचाकीवर आलेल्या 8 चोरट्यांनी त्यांना दुचाकी आडवी लावली. धमकावून त्यांच्याजवळील 1 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेले. त्यामुळे विकास भयंकर घाबरले होते. त्यांनी कोंढवा पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.