
विनयभंग प्रकरणातील दीड वर्षांपासून फरारी असलेल्या सराईत आरोपीला स्वारगेट पोलिसांनी अटक केले. अम्मार मुक्तार शेख (वय 28 रा. सय्यदनगर, वानवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, वैभव शीतकाळ पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी दीड वर्षांपासून फरारी असलेला सराईत अम्मार शेख गुलटेकडी परिसरात येणार असल्याची माहिती ज्ञाना बडे आणि मनोज भोकरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अम्मारला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जयभाय महेंद्र जगताप, सचिन दळवी, वैभव शीतकाळ, अमित शिंदे यांच्या पथकाने केली.
आपली प्रतिक्रिया द्या