
पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी डेक्कन क्वीन आणि लोणावळा लोकल एकाच रुळावर जवळ जवळ आल्याने प्रवाशांमध्ये घबराट झाली होती, मात्र लोकलला दोन्ही बाजूला चालकाची केबिन असते. त्यामुळे डेक्कन क्कीनच्या प्रवाशांना लोकल त्यांच्या दिशेने येत असल्याचा भास झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. यात कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेत आला.
मळवली परिसरात सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार घडला. मळवली ते लोणावळा स्थानकांदरम्यान रुळाला तडे गेल्यामुळे रेल्वे वाहतूक करणे शक्य नव्हते. त्यामुळे लोणावळ्याकडे जाणाऱया लोकलला मळवली स्थानकाजवळ रेड सिग्नल मिळाल्याने ती मार्गावरच उभी करण्यात आली होती. त्यापाठोपाठ डेक्कन क्कीन सकाळी सव्वासातच्या सुमारास पुण्यातून मुंबईला जाण्यासाठी रवाना झाली. सकाळी आठच्या सुमारास डेक्कन क्कीनही मळवली स्थानकातून पुढे मार्गस्थ झाली. त्या वेळी समोर त्याच मार्गावर लोकल होती. त्यामुळे डेक्कन क्कीन लोकलच्या अलीकडे शंभर ते दीडशे मीटर अंतराकर थांबवाकी लागली. एकाच मार्गावर दोन गाडय़ा पाहून प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. लोणावळा ते तळेगाव या दरम्यान ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये दर एक किमी अंतरावर सिग्नल बसविले आहेत. पुढील मार्ग मोकळा आहे किंवा नाही त्यानुसार मार्गावरील गाडीला सिग्नल मिळतो. दरम्यान, या प्रकारामुळे काही प्रमाणात गाडय़ांना उशीर झाल्याचे सांगण्यात आले.
डेक्कन क्वीन आणि लोणावळा लोकल दोन्ही गाडय़ा मुंबईकडे जाणाऱया होत्या. यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता. लोकलच्या दोन्ही बाजूंना चालकाची केबिन असल्याने लोकांमध्ये घबराट झाल्याची शक्यता आहे. असे रेल्वे जनसंपर्क अधिकारी,मनोज झंकर यांनी सांगितले.



























































