उड्डाणपूल पाडण्याच्या कामामुळे गणेशखिंड रस्त्यावर वाहतूक बदल

642

मेट्रोच्या कामामुळे गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपुल पाडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.

पहिल्या टप्यात पाषाणकडे जाणारा उड्डाणपुलाचा भाग पाडण्यात येणार आहे. त्यामुळे विद्याापीठ चौकातील वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेला बदल पुढीलप्रमाणे-

औंध रस्ता, बाणेर रस्ता, पाषाणकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक सुरु राहणार आहे. शिवाजीनगरकडून औंध, बाणेरकडे जाणारी वाहतूक सुरू ठेवली जाणार आहे. शिवाजीनगरकडून पाषाणकडे जाणाऱ्या वाहनांनी उड्डाणपुलावरुन बाणेरकडे जावे. तेथून अभिमानश्री सोसायटीकडून बाणेर चौकात वळून पाषाणकडे मार्गाने जावे. सेनापती बापट रस्त्यावरुन शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक सुरु ठेवण्यात येणार आहे . सेनापती बापट रस्त्यावरुन पाषाण, औंध, बाणेरकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी अनगळ लेनमार्गे गणेशखिंड रस्ता गणपती मंदिरमार्गे विद्याापीठ चौकातुन मार्गस्थ होऊन पाषाण,औंध, बाणेरकडे जावे.

दुसऱ्या टप्यात बाणेरकडे उतरणारा उड्डाणपुलाचा भाग पाडण्यात येणार आहे. त्यामुळे तेथील वाहतूक बदल पुढीलप्रमाणे-

औंध, बाणेर, पाषाणकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक सुरू ठेवली जाणार आहे. तर शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहतूकही सुरु राहणार आहे. शिवाजीनगरकडून पाषाणकडे जाणाऱ्या वाहनांनी रेंजहिल्स चौकातून सेनापती बापट रस्ता चौक, विद्याापीठ चौकात येऊन पाषाणकडे जावे. शिवाजीनगरकडून बाणेरकडे जाणाऱ्या वाहनांनी रेंजहिल्स चौकातून सेनापती बापट रस्ता चौक, वैकुंठ मेहता संस्था, विद्याापीठ चौकात यावे. तेथून पाषाण रस्त्याने अभिमानश्री सोसायटी पाषाण चौकातून उजवीकडून वळून बाणेर रस्त्यावर यावे.

तिसऱ्या टप्यात औंधकडे जाणारा उड्डाणपुलाचा भाग पाडताना औंध रस्ता, बाणेर रस्ता, पाषाणकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक सुरु राहिल. शिवाजीनगरकडून पाषाण, बाणेरकडे जाणाºया वाहनांनी रेंजहिल्स चौकातून सेनापती बापट रस्ता चौक, विद्याापीठ चौकमार्गे पाषाण किंवा बाणेरकडे जावे.

चौथ्या टप्यात उर्वरित उड्डाणपुल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे विद्याापीठ चौकातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. पाषाणकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी अभिमानश्री सोसायटी चौकातून डावीकडे वळून बाणेर रस्त्यावर यावे. तेथून शिवाजीनगरकडे जावे. औंध रस्ता, बाणेर रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक सुरु राहिल. शिवाजीनगरकडून औंध रस्ता, पाषाण, बाणेरकडे जाणाऱ्या वाहनांनी रेंजहिल्स चौक, विद्याापीठ चौक मार्गे औंध,पाषाण, बाणेरकडे जावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या