गौतम पाषाण पुण्यात दाखल, अनेक दिवसांपासून होते बेपत्ता

उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेने त्यांना जयपूर येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मििंसग झाल्याची नोंद करण्यात आली होती.

पाषाणकर 21 ऑक्टोबरला बेपत्ता झाले होते. त्यानंतर ते पुण्यातील सेंट्रल बिंल्डग भागात एका विक्रेत्याकडे नारळ पाणी घेताना दिसून आले होते. गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे. काही दिवसांनी पाषाणकर कोल्हापूर शहरात दिसून आले होते. एका हॉटेलमध्ये ते राहिल्याचे सीसीटीव्ही पोलिसांना मिळाले होते. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फूटज पाषाणकर यांच्या कुटुंबाला दाखविले. ओळख पटल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकांनी कोल्हापूर येथे धाव घेत तपास केला. पाषाणकर हे कोकणात गेले असावी अशी शक्यता गृहीत धरून गुन्हे शाखेची पथके रवाना झाली होती.

त्यांचा शोध घेतला जात असताना पाषाणकर आज गुलाबी शहर जयपूर येथे मिळून आले आहेत. आता त्यांच्या बेपत्ता होण्या मागची अनेक कारणे स्पष्ट झालेली नाहीत. त्याबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, योगेश जगताप, अय्यास दड्डीकर, बामगुडे यांच्या पथकाने केली.

”गौतम पाषाणकर यांनी रेल्वेतून पुणे, कोल्हापूर, बंगलोर, कोईम्बतूर, कोलकाता, दिल्ली, जयपूर असा प्रवास केला. कुटूंब आणि पोलिसांपासून ओळख लपविण्यासाठी प्रयत्न केला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय कौशलपुर्ण तपास करुन त्यांचा शोध घेतला आहे. त्यांच्या गायब होण्याचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.” – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त पुणे

आपली प्रतिक्रिया द्या