
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसंर्ग टाळण्यासाठी जवळ कशाला बसला अशी विचारणा केल्यानंतर झालेल्या वादातून एकाच्या तिघांनी घरात घुसून एका व्यक्तीसह दोन मुलींना मारहाण केली. याप्रकरणी वानवडी पोलिसानी एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी संजय कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय त्यांच्या मुलीसह घराबाहेर बसले असताना एक महिला तेथे आली. तिने तुम्ही एवढ्या जवळ जवळ कशाला बसलाय म्हणून संजय आणि त्यांच्या मुलींना शिवीगाळ केला. त्यानंतर तिने अनोळखी व्यक्तींना फोन करून संजय यांच्या घराजवळ बोलवून घेतले. चौघांनी घरात घुसून त्यातील एकाने त्याच्या दांडक्याने संजय कांबळे यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. तसेच त्यांच्या दोन मुलींना मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
























































