
सामना ऑनलाईन । पुणे
पुण्यातील जुना बाजार परिसरातील शाहीर अमर शेख चौकामध्ये मोठं होर्डींग कोसळून चौघांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सिग्नलवर उभ्या असलेल्या रिक्षांवर होर्डींग कोसळताना दिसत आहे. त्यानंतर लोकांची धावपळ आणि जखमींना वाचवण्यासाठीची धावपळ दिसत आहे. परंतु या व्हिडीओत निरखून पाहिले असता असे निदर्शनात येते की होर्डींग कोसळण्यापूर्वी होर्डीगच्या खाली दोन व्यक्ती काही तरी करताना दिसत आहेत. होर्डींग कोसळण्यापूर्वी त्यातील एक व्यक्ती काही तरी खेचताना दिसतो आणि होर्डींग कोसळते. तर दुसरा व्यक्ती होर्डींगच्या खाली दिसत असून होर्डींग कोसळताना त्याने पळ काढताना दिसत आहे. या दोन व्यक्ती नक्की कोण आहेत? या व्यक्ती तिथे काय काम करत होत्या? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
EXCLUSIVE : पुण्यातील होर्डींग कोसळतानाचे भयानक सीसीटीव्ही दृश्य
दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी या प्रकरणी रेल्वे प्रशासानावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. तर नियम मोडून हे जाहिरात फलक उभारण्यात आल्याचे महापौर मुक्ता टिकळ यांनी म्हटले आहे.





























































