पुणे – घरफोडीचा हैदोस कायम; पर्वती दर्शन, येवलेवाडी, सकाळनगरमध्ये चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील विविध भागात चोरट्यांनी घरफोडीचा हैदास घातला आहे. पर्वतीदर्शन, येवलेवाडी आणि सकाळनगरमधील बंद घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी 5 लाख 50 हजारांवर ऐवज चोरून नेला आहे.

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कॅमेरा आणि सोन्या-चांदीचे दागिने मिळून 3 लाख 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सकाळनगरमधील इमारत क्रमांक 18 मध्ये घडली आहे. याप्रकरणी कौस्तुभ दास (वय 37) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून कपाटातील 1 लाख 40 हजारांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना दोन दिवसांपुर्वी पर्वती दर्शनमधील फुले व्हिला हौसिंग सोसायटीत घडली. याप्रकरणी विक्रांत लाटे (वय 48) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी मोबाईल दुकानाचे कुलूप तोडून 61 हजार 500 रूपयांचे 5 मोबाईल चोरून नेले. ही घटना येवलेवाडीत घडली आहे. याप्रकरणी गोविंद क्षीरसागर (वय 26) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.