Video – पुण्यात विसर्जन मिरवणूकीदरम्यान दोन गटात राडा, दगडफेकीत महिला व मुलं जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणपती विसर्जनाच्या मिरवणूका सुरू होऊन 24 तास उलटले तरी अद्याप मिरवणूका सुरू आहेत. अशातच गणपतीच्या मिरवणूकीला गालबोट लागल्याचे वृत्त समोर आले आहे. पुण्यातील सहकारनगर येथील तळजाई येथे दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटातील टोळक्यांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. यात काही महिला व मुलं जखमी झाले आहेत.