पुण्यात मूकबधिरांवर पोलिसांचा अमानुष लाठीहल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पुणे

विविध मागण्यांसाठी सोमवारी पुण्याच्या समाजकल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱया मूकबधिरांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी त्यांना गुरासारखे झोडपले. या मूकबधिरांकडे विरोध करण्यासाठी शब्द नव्हते. ते फक्त किंचाळत होते. ज्यांना आवाज नाही त्यांचा आवाजच दडपून टाकण्यात आला. सैरभैर झालेली मुले वेदनेने विव्हळत होती. पोलिसांचे दांडके बोलत होते. त्यात कुणाच्या पाठीवर वळ उठले तर कुणाचे ढोपर फुटले… इतका अत्याचार होऊनही या मूकबधिरांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.