लॉकडाउनमध्ये पुणे शहरात आत्महत्या घटल्या; एसएनडीटी महाविद्यालयाचा अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाउनमध्ये शहरात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आत्महत्येच्या प्रकारामध्ये घट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार एसएनडीटी कला व वाणिज्य महाविद्यालयाद्वारे करण्यात आलेल्या अहवाल हे स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय एकत्र कुटुंबात कमी आत्महत्या झाल्या असून दोन किंवा त्यापेक्षा कमी व्यक्ती असलेल्या कुटुंबात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे दिसून आले आहे. महाविद्यालयाच्या उप प्राचार्या माधवी कुलकर्णी, प्राध्यपिका मानसी जोशी आणि वासंती राजहंस यांच्या टीमने अहवाल पुणे पोलिसांना दिला आहे.

पुणे पोलिसांनी एसएनडाटी कला व वाणिज्य महाविद्यालयाला लॉकडाउनमध्ये झालेल्या आत्महत्यांचा अभ्यास करण्यास सांगितले होते. त्यासाठी मार्च ते जुलै 2019 आणि मार्च ते जुलै 2020 यादरम्यान घडलेल्या आत्महत्याची माहिती त्यांना अभ्यासासाठी देण्यात आली होती. शहरात मार्च ते जुलै 2019 मध्ये 305 आत्महत्याचे प्रकार घडले होते. यावर्षी मार्च ते जुलै 2020 लॉकडाउनच्या काळात 264 आत्महत्या घडल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 13.44 टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. वय, पुरुष-महिला, आर्थिक स्तर या सर्वच स्तरावर आत्महत्यामध्ये जास्त बदल झाल्याचे दिसून आले नाही.

शहरातील घडलेल्या आत्महत्येची माहिती

वय 2019 (साल) 2020
0-20 32 29
20 – 40 179 160
40 -60 60 53
60- 80 18 15
माहिती नाही 13 5

आर्थिक स्तरानुसार माहिती

2019 2020
गरीब 77 89
मध्यम 163 136
श्रीमंत 4 6
माहिती नाही 47 33

रोजगारानुसार माहिती

2019 2020
बेरोजगार 58 41
घरगुती 30 24
शिक्षण 26 20
नोकरी 75 78
व्यवसायिक 30 21
माहिती नाही 86 80

आत्महत्येची कारणे साल 2020

आजार 29, कौटुंबिक वाद 42, प्रेम प्रकरण 05, आहारी जाणे 33, आर्थिक कारण 09, नैराश्य 38, माहित नाही 108, आत्महत्याचा प्रकार – गळफास 107, विषप्राशन 7, पाण्यात बुडून 3, स्वतः जखमी 5, उंचावरून उडी 7, जाळून घेणे 1

दक्ष राहण्याची गरज

अनलॉकच्या कालावधीत नागरिकांकडे लक्ष देण्याची आश्यकता आहे. त्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. गरीब नागरिकांमध्ये आत्महत्याचे प्रामाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गरीब वस्तींमध्ये मोठ्या प्रमाणात मानसिक आरोग्य केंद्र स्थापन केली पाहिजे. त्यांना मानसिक आरोग्य बद्दल प्रशिक्षण देऊ शकलो तर अधिक फायदा ठरणार आहे, असे मत राजहंस यांनी व्यक्त केले.