पुण्यात म्हात्रे पुलावरून उडी मारून व्यक्तीची आत्महत्या, कारण अस्पष्ट 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

पुण्यात म्हात्रे पुलावरून एका व्यक्तीने रविवारी दुपारी दीडच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिस नियंत्रण कक्षाला दुपारी दीडच्या सुमारास एका व्यक्तीने म्हात्रे पुलावरून उडी मारल्याची माहिती मिळाली. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी व अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

उडी मारल्यानंतर व्यक्ती  पडल्यामुळे गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्याकडे ओळख पटण्यासारखे काहीच नव्हते. त्यामुळे व्यक्तीची ओळख पटविण्याचे व त्याने आत्महत्या का केली याचा तपास केला जात आहे, अशी माहिती डेक्कन पोलिसानी दिली.