पुणे – कोयत्याच्या धाकाने तरूणाला लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोयत्याचा धाक दाखवून दोघा सराईतांनी तरूणाकडील रोकड आणि दुचाकी चोरून नेली. ही घटना 20 जुलैला रात्री साडेदहाच्या सुमारास लोहियानगरमधील गल्ली क्रमांक तीनमध्ये घडली.

आदर्श हनवते आणि साहिल अडागळे यांच्याविरूद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव कांबळे (वय 19 रा. लोहियानगर ) यांनी तक्रार दिली आहे.

नामदेव आणि आरोपी आदर्श व साहिल ओळखीचे आहेत. 20 जुलैला नामदेव लोहियानगरमध्ये थांबलेला असताना, सराईत आदर्शने कोयता बाहेर काढून तरूणाला शिवीगाळ केली. खुद को भाई समझता है क्या, असली भाई हम है असे म्हणत नामदेवच्या खिशातील ७०० रूपयांची रोकड हिसकावून घेतली. बांबूने मारहाण करून जखमी करीत त्यांच्याकडील दुचाकी चोरून नेली. परिसरात आरडाओरड केल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस उपनिरीक्षक अतुल बनकर तपास करीत आहेत.