Video गाणी गात स्वच्छता कर्मचारी देतोय स्वच्छतेचे धडे

665

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाबाबत देशभरात जनजागृती केली जात आहे. मात्र तरिही अद्याप देशात स्वच्छतेबाबत तितकी जागरुकता आलेली दिसत नाही. म्हणूनच पुणे महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी महादेव जाधव यांनी जनजागृतीसाठी एक वेगळी शक्कल लढवली आहे. जाधव हे गाणी गात स्वच्छतेचे घडे देत आहेत. त्यांच्या गाण्यांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

महादेव जाधव हे गेल्या 25 वर्षांपासून पुणे महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत आहेत. तेव्हापासून ते स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी गाणी गातात. कामावर असताना, एखाद्या कार्यक्रमात ते स्वच्छतेबाबत गाणी गाऊन जनजागृती करतात. ‘मी गाणं गाऊ शकतो. गाण्याच्या माध्यमातून आपण जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी मी माझ्यातील या कलेचा वापर करतो’असे जाधव यांनी सांगितले. जाधव हे त्यांच्या गाण्यातून प्लॅस्टिक बंदिचा देखील संदेश देतात.

आपली प्रतिक्रिया द्या