
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. नवरात्रीचे नऊ दिवस पावसाने बिलकून गोंधळ न घातल्यामुळे लोकांना दांडीया व गरब्याची धूम अनुभवता आली. मात्र दसऱ्याच्या दिवशी पाऊस पुन्हा हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
ऑक्टोबरपर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र यंदा मान्सूनचा परतीच्या प्रवासाची तारिख लांबण्याची शक्यता आहे. उत्तर हिंदुस्थानातून मान्सूनन परतला असला तरी महाराष्ट्रात आणखी काही दिवस त्याचा मुक्काम राहणार आहे. उद्यापासून मुंबई व पुण्यात पुन्हा पावसाची बॅटिंग सुरू होणार आहे. ”मान्सूनने यंदा अद्याप त्याचा परतीचा प्रवास सुरू केलेला नाही. महाराष्ट्रात पुढील 48 तास पावसाचे वातावरण असणार असून काही भागाच तुरळक सरी कोसळतील. मात्र 5 ऑक्टोबरच्या संध्याकाळनंतर उत्तर कोकणआणि मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस दुपारी किंवा संध्याकाळीच पडण्याची शक्यता आहे”, असे पुण्याच्या हवामान खात्याचे प्रमुख अनुपमा कश्यपी यांनी सांगितले.






























































