
चित्रपट सेनेच्या नावाने पुणे आणि नाशिकमध्ये नियुक्तीपत्र वाटपाचा परस्पर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. येत्या रविवारी हा कार्यक्रम होणार असल्याचे कळते. परंतु, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अशाप्रकारचा कोणताही कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही, असा कार्यक्रम घेऊन चित्रपट सेनेच्या नावाने नियुक्तीपत्रांचे वाटप झाल्यास या नियुक्त्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आले आहे.
































































