लिफ्ट वापरण्यास मनाई केल्याने डिलिव्हरी बॉयने इमारतीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीत सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला आहे.
पिंपरी चिंचवडमधील रावेत परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही धक्कादायक घडली. झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयला सुरक्षारक्षकाने लिफ्ट वापरण्यास मनाई केली. यानंतर डिलिव्हरी बॉय तेथून निघून गेला. मात्र याचा राग मनात ठेवून थोड्या वेळाने 5-6 साथीदारांना घेऊन तो पुन्हा इमारतीत आला. सर्वजण डिलिव्हरी बॉय आहेत. यानंतर या टोळक्याने सुरक्षारक्षकाला मारहाण केली.
जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाची प्रकृती आता स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल करत डिलिव्हरी बॉय आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे.