
पुण्यातील राजगुरुनगरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून कोचिंग क्लासेसमध्ये एका विद्यार्थ्याने दुसऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. शहरातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या कोचिंग क्लासमध्ये सोमवारी सकाळी हा रक्तरंजित राडा झाला. पुष्कर दिलीप शिंगाडे असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.
घटनेनंतर हल्ला करणारा विद्यार्थी आणि त्याच्या साथीदाराने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होत घटनेची माहिती दिली. राजगुरुनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. चाकू हल्ल्यात जखमी पुष्करला पोलिसांनी तात्काळ चांडोली रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.



























































