पुणे – रोनाबाधित ज्येष्ठ महिलेची आत्महत्या, हडपसर येथील कॅनोलमध्ये मारली उडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
death

रुग्णालयामध्ये तीन कोरोना रुग्णांचा पाठोपाठ मृत्यू झाल्याने घाबरलेल्या ज्येष्ठ कोरोनाबाधित महिलेने रुग्णालयातून पळ काढून हडपसर येथील कॅनोलमध्ये उडी मारून आत्महत्या केली. संबंधित महिला रुग्णालयातून पळून गेल्यावर समर्थ पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद दाखल झाली होती. रविवारी सकाळी हडपसर येथील मुठा कालव्यात 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता.

हडपसरमध्ये कॅनोलमध्ये मृतदेह आढळून आल्यानंतर समर्थ पोलिसांच्या पथकाने बुधवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर महिलेच्या कपड्यांवरून तिची ओळख पटविली. संबंधित महिलेवर गणेश पेठेतील खासगी रुग्णालयात दाखल होती. तिच्या समोर कोरोना बाधित तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर ती नैराश्यात गेली. तिने तिच्या नातेवाईकांना फोन केला आणि त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. तिची मानसिक परिस्थिती लक्षात घेऊन कुटुंबातील सदस्यांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, शनिवारी पहाटे ती कोणासही न सांगता रुग्णालयाच्या आवारात निघून गेल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.