
पुणे शहरात प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन देण्यासाठी लष्कर पोलिसांकडून माझी रिक्षा सुरक्षित रिक्षा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रिक्षा चालकांची प्रतिमा उंचविण्यासाठी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चालकांनी 5 ऑक्टोबरपर्यंत लष्कर पोलीस ठाण्यात नावनोंदणी करावी. स्पर्धेत विजयी ठरलेल्या रिक्षा चालकांना रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत.
नवरात्रौत्सवात स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) तसेच पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करणाऱ्या रिक्षा चालकांना बक्षीसे देण्यात येणार आहे, अशी माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे, लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम उपस्थित होते.
माझी रिक्षा सुरक्षित रिक्षा स्पर्धेचे आयोजन 7 ते 19 ऑक्टोबर दरम्यान करण्यात येणार आहे. स्पर्धेत पहिला क्रमांक पटाकविणाNया रिक्षा चालकास 11 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 5 हजार आणि तृतीय क्रमांकास 3 हजार रोख बक्षीस देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ प्रत्येकी एक हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रिक्षा चालकांनी 5 ऑक्टोबरपर्यंत लष्कर पोलीस ठाण्यात नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोट- शहरातील प्रामाणिक रिक्षा चालकांना प्रेरणा मिळावी, याहेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आरटीओ कार्यालयासह वाहतूक नियमांचे पालन करणाNया रिक्षाचालकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करावी. – अशोक कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस ठाणे






















































