सर्व पोलिसांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश, पोलीस आयुक्तांच्या पोलीस ठाणे प्रमुखांना सूचना

फोटो प्रातिनिधीक

शहरात दिवसेंदिवस पोलिसांना कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत आहे. दररोज 12 ते 15 पोलिस बाधित होत आहेत. त्यापाश्र्वभूमवीर शहरातील सर्व पोलिसांच्या कोरोना चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दररोज क्षमतेनुसार चाचण्या केल्या जात आहेत. त्यामध्ये काहीजण बाधित असल्याचे आढळून येत आहे. अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

वाढत्या कोरोना संसर्गामुळे कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी काळजी घेणे आवाश्यक आहे. ड्युटी करताना कोरोना नियमावलीचे पालन करणे महत्वाचे आहे. दरम्यान, शहरातील गर्दीची ठिकाणे एसटी बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि मार्केटयार्ड परिसरात पोलिस आयुक्तांनी सोमवारी स्वतः भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी बस स्थानक व रेल्वे स्थानक येथे नियमांचे पालन केले जात असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मार्केटयार्डात नियमांचे पालन होतान दिसले नाही. त्याठिकाणी पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी लक्ष देऊन गर्दी कमी होण्यासाठी नियोजन केले आहे. तरीही, नागरिकांसह वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे गर्दी होत आहे. त्यामध्ये आणखी सुधारणा होउन गर्दी कमी करणे अपेक्षित आहे. सुधारणा न झाल्यास मार्केटयार्ड बंद करण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या