
शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वेगाने फोफावत असून संसर्गाने बाधित होणाऱ्या संख्येत पोलिस कर्मचाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत 1 हजार 530 पोलिसांना कोरोना झाला असुन सध्या 42 पोलिसांवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.
बंदोबस्त, नाकाबंदीसह अनेकांच्या संपर्कात येणाऱ्या पोलिसांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. आतापर्यंत 158 पोलिस अधिकाऱ्यासह 1 हजार 372 कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाने ग्रासले आहे. त्यापैकी बहुतांश जण उपचारानंतर घरी परतले होते. मागील काही महिन्यांत संसर्ग कमी झाल्यानंतर उपचार घेणाNया पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या 4 पर्यंत होती. मात्र, आता कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर पुन्हा बाधित होणाीऱ्या पोलिसांची संख्या वेगाने वाढत आहे. शहरात सध्या कोरोनाग्रस्त 42 पोलिस उपचार घेत असून त्यामध्ये 9 अधिकारी व 33 कर्मचारी आहेत. 42 पैकी 16 पोलिस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. 26 जण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी उपचार घेत आहेत. त्यामुळे पोलिसांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, मागील आठवड्यात शास्त्री रस्त्यावर एमपीएसीच्या विद्याथ्र्यांनी केलेल्या आंदोलनावेळी बंदोबस्तावर असणारे विशेष शाखेतील दोन अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांच्या संपर्कातील पोलिस क्वारंटाईन करण्यात आले आहे.
6 हजार 500 पोलिसांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस
पोलिस दलातील साडेसहा हजारांवर अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्याशिवाय 84 पोलिसांनी दुसराही डोस घेतला आहेत. सध्या पोलिसांचे लसीकरण जोमाने सुरू आहे. लस घेतलेल्या काही पोलिसांना कोरोना झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्याबाबत अभ्यास केला जात आहे.
शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना पोलिस दलामध्येही संसर्ग वाढत आहे. बाधितांची संख्या 42 वर गेली आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे. – अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणे






















































