पोलीस ठाण्यांना कोरोना विरोधी उपकरांचे वितरण; मास्क, वाफ घेण्याचे मशीनसह केले फूड वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतरही पोलिसांकडून दिवसरात्र रस्त्यावर उतरून काम केले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी विविध कंपनीच्यावतीने चार पोलीस ठाण्यांना मास्क आणि वाफ घेण्याच्या मशीनसह फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले. समर्थ पोलीस ठाणे, वाहतूक विभाग, चतुःशृंगी, बंडगार्डन पोलिसांना उपकरांचे वितरण करण्यात आले. यावेळी आयआरबीचे सरव्यवस्थापक रवींद्र वायाळ, अविनाश तपासे, अतुल जगताप, संजय भंडारी उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आरबीआय, कॉन्सन्ट्रीक्स कंपनी, कॉम्पिटीटर्स फाउंडेशनच्यावतीने चार पोलीस ठाण्यांना प्रत्येकी 5 वाफ घेण्याची यंत्रे, 250 मास्क आणि 50 फूड पॅकेट्स देण्यात आले. समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाकचवरे आणि बंडगार्डनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या हस्ते उपकरांसह मास्कचे कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले. बंदोबस्तासह नाकाबंदीत पोलीस सातत्याने लोकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. त्यापार्श्वभूमीवर वंâपन्यांच्यावतीने वितरित करण्यात आलेल्या साहित्यांचा उपयोग होणार आहे. विविध सामाजिक संस्थांनी मास्क आणि वापेâचे किट दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होणार असल्याचे पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी सांगितले.