पुण्यात लोकांच्या सूचनेनुसार काम केले – पोलीस आयुक्त डॉ. के वेंकेटेशम

शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. विशेषतः लोकांच्या सूचनेनुसार सर्व गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून केल्यामुळे फायदा झाला. पुणेकरांनी भरभरून प्रेम दिल्यामुळेच सर्व काही शक्य झाल्याचे मत पोलीस आयुक्त डॉ. के वेंकेटेशम (dr k Venkatesham) यांनी व्यक्त केले.

पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे उपस्थित होते.

डॉ. के वेंकेटेशम म्हणाले, प्रत्येकाच्या गरजा लक्षात घेऊन पविविध पोलीस ठाण्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केला. दोन वर्षात नाविन्यपूर्ण योजनांमुळे पुणेकरांची सेवा करण्यास संधी मिळाली. महिलांसाठी भरोसा सेल, गुन्हेगारीचा आढावा घेण्यासाठी टीआरएम बैठक, क्रीप्स योजनेमुळे गुन्हेगारी मूल्यमापन करता आले. विविध योजना राबविवून त्याचे मूल्यमापन करीर झालेला फायदा आणि तोट्याचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यामुळे नागरिकांना फायदा झाला.

त्याशिवाय शहरातील वाहतूक सुधारणासाठी लक्ष्य केंद्रित केले. त्यासाठी सामाजिक संस्थाना सोबत घेऊन काम केले. ट्राफिक क्लब, आयटीएमएस सिग्नल यंत्रणा राबवून अपघाती मृत्युचे प्रमाण कमी केले. देशात अपघाती मृत्यूचे प्रमाण सरासरी 10 टक्के आहे. मात्र, गेल्या वर्षी पुण्यात त्यापेक्षा कमी अपघाती मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. विविध प्रकारच्या चांगल्या कामामुळे पुणे शहर पोलिसांना जागतिक पातळीवरचे अवाॅर्ड मिळाले आहेत. पुणे पोलिसांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. एक्स्ट्रा अॅप, काॅप्स एक्सलेन्स, यामाध्यमातून कर्मचारी प्रशिक्षीत झाले आहेत. भावनिक प्रज्ञावंतमुळे कर्मचाऱ्यांना फायदा झाला आहे.

त्याशिवाय सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून एका बांधकाम व्यावसायिकाकडून पोलिसांसाठी 176 घरे बांधण्यात येत आहेत. येत्या गुढीपाडव्यापर्यंत पोलीस वसाहतीचे काम पुर्ण होणार आहे. कोरोना कालावधीतही सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जोमाने काम करीत असल्यामुळे नागरिकांना फायदा झाला आहे. पुणेकरांनी चांगले काम करण्याची संधी दिली त्याबद्दल डॉ के. वेंकेटेशम यांनी आभार मानले.

अडीच लाख लोकांचा घेतला फीडबॅक
शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सेवा देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. त्यासाठी नागरिकांनी संबंधित पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारी सोडविल्या की नाही याबाबत माहिती घेण्यासाठी तब्बल 2 लाख 50 हजारांवर तक्रारदारांचे फीडबॅक घेण्यात आले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तक्रारदाराला समस्याचे निवारण होत असल्याची जाणीव झाली.

आपली प्रतिक्रिया द्या