
देशामध्ये प्रथमच पुणे पोलिस आयुक्तालयाने बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल मिस्टिंग सॅनिटायझेशन वाहन तयार केले आहे. पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आणि अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या संकल्पनेतून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली आहे.
https://twitter.com/Saamanaonline/status/1247096903541485571?s=19
शहरात विविध बंदोबस्तात असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. यासाठी पुणे पोलीस मोटर परिवहन विभागामधील वाहनाचा उपयोग करणेत आला आहे. गाडीमध्ये स्प्रेशर फॉगिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे. गाडीमध्ये कर्मचारी 6 ते 10 सेकंदांसाठी उभे राहिल्यास निर्जंतुकीकरण होऊन त्याचा परिणाम काही तासांसाठी राहतो. ह्या वाहनाद्वारे कर्तव्यास ज्या ठिकाणी पोलीस कर्मचारी कामास असतील त्या ठिकाणी जाऊन ही सुविधा देण्यास मदत होईल. देशात पुणे पोलिसांनी प्रथमच संजीवनी वाहनाचा असा प्रयोग केला असून दिवसभर राबणाऱ्या पोलीस कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम राबविला गेल्याने सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. हे वाहन दीपक रोंधे, रोंधे एंटरप्रायजेस यांच्या मदतीने कार्यान्वित करण्यात आले आहे.




























































