
पुणे – सातारा रस्त्यावरील शिरवळजवळ बस आणि कंटेनरची भीषण धडक झाली आहे. या घटनेत चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 23 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सातारा येथील वरवे गावाच्या हद्दीत रविवारी हा अपघात झाला आहे.
या अपघातातील अपघातग्रस्त झालेली वाहनं ही पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात होती. यात एका खासगी महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी बसला कंटेनरची पाठून धडक बसली. ही धडक जोरदार असलाने बस पलटली. ही चारही वाहनं एकमेकांना धडकल्यानंतर खासगी बस पलटून चार जण जागीच ठार झाले.
कंटेनर धडकल्यानंतर एक गाडीही कंटेनरला येऊन धडकली. मात्र, सुदैवाने त्यातील प्रवासी सुखरूप बचावले. अपघातात बसमधील 23 प्रवासी जखमी असून त्यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं. अपघातातील मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
































































