
खासगी शाळेच्या दुरुस्तीसाठी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एकाने शाळा व्यवस्थापिकेकडून 90 हजारांची रोकड घेउन फसवणूक केली.
याप्रकरणी एका महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला हडपसरमधील अश्रया प्रि-स्कुल आणि डे-केअरच्या व्यवस्थापिका आहेत.
त्यांच्या शाळेची दुरुस्ती करायची होती. त्यासाठी आवश्यक कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाने फिर्यादीशी संपर्क वाढविला. त्याचा विश्वास संपादन करून 90 हजारांची रोकड घेतली. पण, कर्ज मंजूर केले नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शाळा व्यवस्थापिकेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक उमेश कदम तपास करीत आहेत.





























































