शिरूर पंचायत समितीच्या सभापतिपदी मोनिका हरगुडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत सभापतिपदी मोनिकाताई नवनाथ हरगुडे व उपसभापतीपदी सविताताई प्रमोद पऱ्हाड यांची निवड करण्यात आली.

शिरूर पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असल्यामुळे विरोधकांनी अर्ज भरला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. सद्यस्थितीमध्ये शिरूर तालुक्यामध्ये आमदार अशोक बापू पवार यांचे नेतृत्व असल्यामुळे अशोक बापू पवार यांच्या नेतृत्वाखाली या पदाची नियुक्ती झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. यामुळे संपुर्ण तालुक्यामध्ये तरुणांनी जल्लोष व्यक्त केला तर अनेक ठिकाणी पेढे वाटून,गुलालाची उधाण करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.