पण ठाकरी बाणा आणि बाप कुठून चोरणार? पुण्यात झळकले उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ बॅनर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यापासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या समर्थनार्थ अनेक शहरांमध्ये पोस्टर्स झळकत आहेत. अशाच प्रकारचा एक पोस्टर पुण्यात झळकला असून त्याच्यातील मजकूराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सगळं चोरलं पण ठाकरे बाणा व बाप कुठून चोरणार? असा सवाल या पोस्टरवरून करण्यात आला आहे. सोबतच आम्ही कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असा मजकूर यामध्ये लिहिला आहे. हे पोस्टर पुण्यातील धनकवडी भागात लावण्यात आले आहे.