पुणे – लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल

563

जमिनीचे हक्कसोडपत्र आणि वाटप पत्राची नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून 20 हजारांची लाच घेणाऱ्या तलाठ्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामकृष्ण तुळशीराम कारंडे वय 35 तलाठी- सोरतापवाडी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रामकृष्ण सोरतापवाडी ता. हवेली येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या जमिनीचे हक्कसोडपत्र आणि वाटप पत्र करण्यासाठी रामकृष्ण यांनी 40 हजारांची लाच मागितली होती. तडजोडीत 20 हजार रुपये स्वीकारल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या