पुणे- पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तरुणावर प्राणघातक हल्ला, तिघांना अटक

515

पुणे येथे भांडणाच्या रागातून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर तलवारीने हातावर, मानेवर, नाकावर वार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर सिमेंट ब्लॉक व फरशीच्या साहाय्याने मारहाण करून गंभीर जखमी करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तिघांना खडकी पोलिसांनी अटक केली. ही घटना काल दुपारी बोपोडीत घडली.

पप्पु उर्फ जयराज रंजन पिल्ले, राकेश वेगडे (धायरी) योगेश चव्हाण (बोपोडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. निखील ताराचंद गायकवाड (23, रा. बोपोडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी स्वप्नील गायकवाड (23) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील चार दिवसांपूर्वी निखील याची पिल्ले, वेगडे आणि चव्हाण या तिघांसोबत भांडणे झाली होती. त्याच कारणातून आरोपींनी इतर दोन साथीदारांच्या मदतीने निखीलवर पालघन, तलवारीन वार केले. त्यानंतर सिमेंट ब्लॉक व फरशीने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विनायक कोळी तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या