पुणे – वानवडी आणि टिंगरेनगरमध्ये घरफोडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात घरफोडीचे सत्र सुरुच असून टिंगरेनगर आणि वानवडी परिसरात दोन घटना घडल्या आहेत. त्यामध्ये दोन लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला असून विश्रांतवाडी व वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टिंगरेनगर येथील यशश्री स्वराज हौसिंग सोसायटीमध्ये मंगेश विजय नेरकर (वय 47) यांचा फ्लॅट आहे. 17 डिसेंबरला ते कुटुंबासह सोलापूर येथे गावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून कपाटामध्ये ठेवलेले दागिने व रोकड असा 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. नेरकर दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी बंद दुकानाचे शटर उचकटून दुचाकी आणि लॅपटॉप मिळून दीड लाखांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मोनिका आशिष गायकवाड (वय 34) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गायकवाड यांचे महंमदवाडी परिसरातील क्रिस्टल सोसायटी येथे मम्मी मोटार्स नावाचे दुकान आहे. गुरूवारी रात्री ते दुकान बंद करून घरी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी दुकानाचे लॉक तोडून आतमध्ये असेलली दुचाकी व लॅपटॉप असा 1 लाख 47 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनिरीक्षक ए. ए. डोंबाळे हे अधिक तपास करत आहेत.