पुणे शहरात वादळी पावसाचा फटका, झाडं कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

पुणे शहरात गुरूवारपासून वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे अनेक भागात झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या चोवीस तासात शहरात वेगवेगळ्या नऊ ठिकाणी रस्त्यावर झाडं पडल्याने वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन झाडं हटवून रस्ता मोकळा केला. आज सकाळपासून पावसाचा जोर ओसरला होता.

गेल्या चोवीस तासात वादळी पावसामुळे झाडांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्या होत्या. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडांच्या फांद्या हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. गणेशखिंड रस्ता, पर्वती भागातील रमणा गणपती मंदिर, सहकारमधील शिंदे हायस्कुलसमोर, प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक तीन, सेनापती बापट रस्त्यावरील पेट्रोल पंप, कोथरूड भागातील आयडिएल कॉलनी, सदाशिव पेठेतील लज्जत हॉटेलसमोर, खडकीतील रॉयल सोसायटीसमोर, कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनीत झाडे पडल्याच्या घटना घडल्या, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या