
पर्वतीमधील जनता वसाहतीत ‘मीच भाई’ असल्याची धमकी देत आरोपीने साथीदारांच्या मदतीने एकावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. ही घटना 18 मार्चला संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पर्वतीतील जनता वसाहतीत घडली.
नवनाथ वाडकर, सनी पवार, आदित्य खंडागळे, सोनू चव्हाण यांच्याविरूद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विनोद मालुसरे (वय 42) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तुमच्या पोराला मी मारून टाकणार आहे, त्याला भाई बनायचे आहे.
‘तुमच्या पोराला मी मारून टाकणार आहे, त्याला भाई बनायचे आहे. मीच जनता वसाहतीतील भाई असल्याचे म्हणत नवनाथ याने विनोदवर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुचाकीची तोडफोड करून टोळक्याने परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खरात तपास करीत आहेत.




























































