
गुलटेकडी परिसरात दुचाकी वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवणाऱ्या दोघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केले आहे. तीन दिवसांपुर्वी वाहन तोडफोडीची घटना घडली होती. आदर्श नरसिंग उदबाळे (23) आणि अनिकेत बाबा खंडाळे ( 20, दोघेही रा. डायसप्लॉट, गुलटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
दहशत निर्माण करण्यासाठी तीन दिवसांपुर्वी आरोपींनी हातात कोयता आणि लोखंडी रॉडने गुलटेकडीतील दुचाकी वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलिस तपास करीत असताना, वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची माहिती पोलिस शिपाई ज्ञाना बडे आणि मनोज भोकरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी वाहनांची तोडफोड केल्याची कबुली दिली. त्यांच्या एका साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, सचिन कदम, विजय कुंभार, विजय खोमणे, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, सचिन दळवी, संदीप साळवे, सोमनाथ कांबळे, वैभव शीतकाल, लखन ढावरे, शंकर गायकवाड, ऋषि तिथमे यांच्या पथकाने केली.




























































