अधिसभा निवडणुकीत शिवसेनेचे बाकेराव बस्ते विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत शिवसेनेच्या बाकेराव बस्ते यांनी खुल्या प्रवर्गातून 2 हजार 230 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. महाविकास आघाडी आणि भाजपने यावेळी प्रथमच थेट पॅनल उभे केले होते. त्यामुळे या अधिसभा निवडणुकीला राजकीय स्वरूप प्राप्त झाले होते.

महाविकास आघाडीच्या सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल आणि भाजपच्या विद्यापीठ विकास मंच यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामुळे मतमोजणीच्या तब्बल सोळा फेऱया पार पडल्या. अधिसभा निवडणुकीचा पाच जागांचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला, तर उर्वरित पाचही खुल्या प्रवर्गातील जागांचा निकाल बुधवारी पहाटे जाहीर झाला. खुल्या प्रवर्गातून प्रसेनजीत फडणवीस 4 हजार 447, सागर वैद्य 3 हजार 711, युवराज नरवडे 3 हजार 283, दादाभाऊ शिनलकर 2 हजार 511, तर बाकेराव बस्ते हे 2 हजार 230 मते मिळवत विजयी झाले.

नियोजनाला थोडा वेळ कमी मिळाला; पण मला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामुळे हे यश मिळालं. आपली भूमिका ही पक्ष आदेशानुसार असेल. विद्यार्थी हा पेंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य दिलं जाईल. शिक्षणाला महत्त्व देऊन कामकाज केलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– बाकेराव बस्ते (शिवसेनेचे सदस्य, सिनेट)