पुणे – उत्तमनगरमध्ये भर दिवसा दोन खुनी हल्ल्याच्या घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder-knife

शहरात भरदिवसा चेनस्नॅचिंग, घरफोड्या, खून, खूनी हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच उत्तमनगरमध्ये एकाच दिवसांत दोन खुनी हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

किरकोळ कारणावरुन चौघांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले आहे. ही घटना काल संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पायगुडे वस्ती परिसरात घडली. याप्रकरणी रामेश्वर इंगळे (वय 21, रा. पायगुडे वस्ती) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुसऱ्या घटनेत चौघांच्या टोळक्याने शतपावली करण्यासाठी चाललेल्या तरुणावर कोयत्याने वार करुन जखमी केले आहे. ही घटना काल रात्री अकराच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेसमोर घडली. याप्रकरणी संदीप सावंत (वय 28, रा. उत्तमनगर) यांनी फिर्याद दिली आहे. काल संध्याकाळी जेवण केल्यानंतर संदीप शतपावली करण्यासाठी चालले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेसमोर आलेल्या चौघांनी संदीपला अमन खान कोठे आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी संदीपने माहिती नसल्याचे सांगताच, चौघांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करुन जखमी केले.

उपनगरांमध्येही वाढतेय क्रुरता
उपनगरांमध्येही किरकोळ कारणांसह पुर्ववैमनस्यातून क्रुरता वाढत चालली असल्याचे दिसून आले आहे. उत्तमनगरमध्ये एकाच दिवसात दोन खुनी हल्ल्याच्या घटनांमुळे नागरिक भीतीखाली आहेत. त्यामुळे पोलिसांनी हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.