
शहरातील आत्महत्येचे सत्र थांबत नसून लॉकडाऊनमुळे काहीही काम नसल्यामुळे तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संध्याराणी मुरलीधर चापलवाड असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याराणीच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. ती ब्युटीशियन असून मागील काही दिवसापासून काम नसल्याने नैराश्यात असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आज संध्याकाळी साडे चारच्या सुमारास तिची आई कामावरुन परतल्यावर त्यांना घरात संध्याने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. संध्याच्या घरात कुठलीच चिठ्ठी आढळली नाही. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल केला आहे.

































































