
पंजाबमध्ये चरणजीत सिंग चन्नी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा आज पार पडला. यावेळी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी 15 मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या मंत्रिमंडळ विस्तार सोहळ्याचा माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे मात्र उपस्थित राहिले नाही.
अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर 20 सप्टेंबर रोजी चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे राज्याची धुरा सोपवण्यात आली. यानंतर काल शनिवारी त्यांनी मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडला. चन्नी यांच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्ध यांचे सल्लागार मोहम्मद मुस्तफा यांच्या पत्नी रजिया सुल्ताना यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
#WATCH | Punjab: Congress MLAs along with their family members reach Raj Bhavan in Chandigarh for the swearing-in ceremony of new ministers pic.twitter.com/SQtSSyl9Ai
— ANI (@ANI) September 26, 2021
ब्रह्म मोहिंद्रा यांनी सर्वात आधी शपथ घेतली. यानंतर मनप्रीत सिंग बादल, रजिया सुल्ताना, तृप्त राजिंदर बाजवा, अरुणा चौधरी, सुखबिंर सिंग सरकारिया, राणा गुरजीत सिंग, विजयिंदर सिंगला, भारत भूषण आशू, रणदीप सिंग नाभा, राजकुमार वेरका, संगतसिंग गिलजिया, परगट सिंग, अमरिंदर सिंग राजा वारिंग आणि गुरकीरत सिंग कोटली यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
Chandigarh: MLAs Razia Sultana, Vijay Inder Singla, Bharat Bhushan Ashu, and Randeep Singh Nabha take oath as Cabinet ministers in Punjab Government pic.twitter.com/9IB6WHmPol
— ANI (@ANI) September 26, 2021





























































