
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पार पडल्या असून निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला अधिक जागा जिंकण्यात यश आलं आहे. तर भाजपाला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशातच भाजपच्या एका महिला उमेदवाराने निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंजाबमधील काँग्रेस सरकारवर ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप केला आहे.
भाजपच्या या महिला उमेदवाराने कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात नारेबाजी करत म्हणाल्या की, ‘माझ्या घरात 15-20 लोकं आहेत, तरीही मला एकूण 9 मतेच मिळाली. कॉंग्रेसने ईव्हीएममध्ये फेरफार केले आहे. मला सर्व चाळींची मते मिळाली आहेत. मात्र रात्रीच मशीन बदलण्यात आली,’ असं त्या म्हणाल्या आहेत.
हार के बाद BJP उम्मीदवार ने लगाया EVM में गड़बड़ी का आरोप, कहा- ‘मेरे घर में ही 15-20 लोग हैं, फिर भी मुझे कुल 9 वोट मिले’#PunjabMunicipalElection2021 #Punjab pic.twitter.com/igIrR8jaFs
— News24 (@news24tvchannel) February 17, 2021
त्या पुढे म्हणाल्या की, ‘येथील 12 प्रभागातून भाजप नेहमीच विजय मिळवीत आला आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने सरकारी यंत्रणांचा वापर केला आहे.’




























































