एकेकाळी पेशावरपर्यंत जाणाऱ्या…108 वर्षांच्या ‘पंजाब मेल’चं रुपडं पालटणार

589

मध्य रेल्वेच्या सर्वात जुन्या गाडय़ांपैकी एक असलेली ‘पंजाब मेल’ लॉकडाऊननंतर अत्याधुनिक ‘एलएचबी’ डब्याच्या संगे प्रकाशांच्या दिमतीला हजर होणार आहे. 108 वर्षे जुन्या असलेल्या पंजाब मेलचा प्रवास स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी बेलार्ड पिअर स्थानक ते थेट पाकिस्तानातील पेशावरपर्यंत व्हायचा. अशा सर्वात जुन्या गाडय़ांपैकी एक असलेल्या पंजाब मेलला अखेर नव्या आधुनिक एलएचबी डब्यांची साजसंगत लाभणार आहे.

1 जून 1912 मध्ये पंजाब मेलचा प्रवास फोर्ट परिसरातील तेव्हाच्या ‘बेलार्ड पिअर’ रेल्वे स्थानकातून सुरु झाला. ही ट्रेन दिल्ली ते चेन्नई दरम्यान धावणाऱ्या ‘ग्रँड ट्रंक एक्सप्रेस’ (1 जानेकारी 1929) पेक्षाही जुनी आहे. अशा या ऐतिहासिक पंजाब मेलच्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात (ट्रेन क्र.12137/12138) चार रेक (गाडय़ा) असून त्यापैकी एका रेकचे ‘एलएचबी’ डब्याच्या गाडीत लवकरच रुपांतर होणार असून लॉकडाऊन संपल्यानंतरच प्रत्यक्षात प्रवाशांना हे आधुनिक रूप पाहायला मिळणार आहे.

तेव्हा बेलार्ड पिअर स्थानकातून प्रवास

ही ट्रेन तेव्हा 46 तासांमध्ये तब्बल 2542 कि.मी.चे अंतर कापायची ! फाळणीनंतर या ट्रेनचा प्रवास सीमावर्ती प्रदेश पंजाबच्या फिरोजपुरपर्यंत मर्यादित करण्यात आला. या पंजाब मेलला जाताना तब्बल 56 तर येताना 54 थांबे आहेत. 1914 पासून ती बेलार्ड पिअर स्थानकाऐवजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून (तेव्हाचे व्हिक्टोरीया टर्मिनस) सुटू लागली. सन 1947 पर्यंत पंजाब मेल सकाळी 9.30 वाजता पेशाकरहून निघायची आणि लाहोरला सायंकाळी 7.45 वा. पोहोचायची, तर रात्री 9.35 वा. फिरोजपुरला पोहचत तिचा प्रवास तिसऱ्या दिवशी सकाळी 7.39 का. बोरीबंदरच्या व्हिक्टोरीया टर्मिनसपर्यंत संपायचा. त्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास येथून सायंकाळी 7.10 वाजता सुरू व्हायचा..आणि तिसरा दिवस तिचा पाकिस्तानच्या पेशावरमध्ये असायचा!

एलएचबीचा साज चढणार

राजधानी आणि दुरांतोसारख्या गाडय़ांना अत्याधुनिक लिंके-हॉफमॅन-बुश (एलएचबी) डबे बसवलेले असतात. या कोचचे वजन हलके असून अपघाताप्रसंगी त्यामुळे कमीत कमी मनुष्यहानी होते. शिवाय टक्कर झाल्यास गाड्यांचे डबे उचलून एकामेकांकर चढण्याची भीतीही राहात नाही. रेल्वेच्या पारंपरिक डब्यांचे उत्पादन 2016 पासून बंद झाले आहे. मध्य रेल्वेने अलिकडेच पंचवटी, कोकणकन्या, उद्यान, सिद्धेश्वर, इंद्रायणी, सिंहगड, डेक्कन एक्सप्रेस, मनमाड, नागकॉईल, गोरखपूर, हावडा मेल या गाडय़ांचे रूपांतर एलएचबी डब्यात केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या