
सामना ऑनलाईन, कोलकाता
निवडणुकीच्या प्रचारासाठी पुरुलियामध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली. दीदींनी मला कानाखाली मारली तर ती देखील माझ्यासाठी आशीर्वाद ठरेल अशा खोचक शब्दात मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर शाब्दीक हल्ला चढवला. ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी मोदींवर टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या की “निवडणूक येताच मोदी रामनामाचा जप करत असतात. त्यांच्यासारखा खोटारडा पंतप्रधान मी आजवर पाहिला नाही. त्यांच्या थोबाडीत मारावीशी वाटते” याच विधानाचा समाचार घेत मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली.
#WATCH PM Modi in Purulia, “Mujhe bataya gaya hai ki yahan Didi ne kahan hai ki woh Modi ko thapad maarna chahti hain. Didi’ o’ Mamata Didi mein toh aapko didi kehta hun, aapka aadar karta hun, aapka thapad bhi mere liye ashirwaad ban jaayega, woh bhi khalunga.” pic.twitter.com/DVZ8MxLVCg
— ANI (@ANI) May 9, 2019
अक्षय कुमारने पंतप्रधान मोदींची मुलाखत घेतली होती, या मुलाखतीमध्ये ममता बॅनर्जी मला कुर्ता आणि मिठाई पाठवतात असं त्यांनी आवर्जून सांगितलं होतं. मात्र निवडणुकीच्या मैदानात वैयक्तिक जीवनातील गोडवा बाजूला सारत मोदी आणि दीदी एकमेकांवर तुटून पडले आहेत. ममता बॅनर्जी यांनी पुरुलियामध्येच त्यांच्या जाहीर सभेत मोदींच्या कानाखाली मारण्याची भाषा केली होती. याच पुरुलियातून मोदींनी त्यांना उत्तर दिले आहे.
पुरुलिया येथे एका प्रचारसभेला ममता बॅनर्जी यांनी ‘मोदींनी ५ वर्षात अच्छे दिन आणण्याच्या गोष्टी केल्या होत्या. परंतु, नंतर त्यांनी नोटाबंदी केली. ते संविधान सुद्धा बदलणार आहेत. भाजपाच्या घोषणांवर माझा तिळमात्र विश्वास नाही. पैसा माझ्यासाठी सर्व काही नाही. मात्र मोदी जेव्हा पश्चिम बंगालमध्ये येतात आणि टीएमसी लुटारुंचा पक्ष असल्याचा आरोप करतात तेव्हा त्यांच्या थोबाडीत मारावीशी वाटते’ असे विधान केले होते.
























































