पुष्करसिंह धामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुष्करसिंह धामी यांनी अखेर रविवारी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल बेनी रानी मोर्या यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात इतर ज्येष्ठ मंत्र्यांनीदेखील मंत्रीपदाची शपथ घेतली. शनिवारी भाजप विधिमंडळाच्या झालेल्या बैठकीत पुष्करसिंह धामी यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. दरम्यान, शपथ ग्रहण केल्यानंतर धामी यांनी सर्वप्रथम सतपाल महाराजांची भेट घेतली.

राजभवनात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्यासह सतपाल महाराज, हरकसिंह रावत या ज्येष्ठ नेत्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. तसेच वंशीधर, यशपाल आर्य, बिशन सिंह आणि सुबोध उनियाल यांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांना मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आल्याने सतपाल महाराज हे नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र धामी यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर सर्वप्रथम सतपाल महाराज यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम लावला.