
सुपरडुपर हिट ‘पुष्पा’ चित्रपटाचा भाग 2 येणार आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना ‘पुष्पा-2’ ची उत्सुकता आहे. या प्रोजेक्टबद्दल नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. ‘पुष्पा-2’ मध्ये सुपरस्टार रामचरणची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे अल्लू अर्जुन आणि रामचरण असा डबल धमाका होणार आहे. रामचरणची भूमिका नक्की कोणती असेल, याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही.
‘पुष्पा द राईज’च्या प्रचंड यशानंतर ‘पुष्पा द रुल’ची घोषणा करण्यात आली आहे. यातील शूटींगचे पह्टो काही दिवसांपूर्वी शेअर झाले होते. अल्लू अर्जुनही लवकरच शूटींगला सुरुवात करणार आहे. हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो.






























































