बोरीवलीत हुल्लडबाजांचा अजगराशी खेळ, पशुकल्याण अधिकाऱ्य़ांची वनखात्याकडे तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा केवळ माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही बसला. या पावसात भरकटलेला एक अजगर बोरीवली येथे काही हुल्लडबाज तरुणांच्या तावडीत सापडला. त्यांनी पोलिसांना त्याची सूचना न देता त्या अजगराशी क्रूर खेळ केला. त्याबद्दल पशूकल्याण अधिकाऱ्य़ांनी वनखात्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.

बोरीवली पूर्वेच्या हनुमान टेकडी भागातील हे तरुण आहेत. पावसात भरकटलेला एक अजगर खांद्यांवर नाचवत हे तरुण क्रूरपणे त्याला हाताळत असल्याचे व्हिडियो आणि छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. एका तरुणाने अजगराचे तोंड हातात घट्ट पकडून त्याच्याबरोबर छायाचित्रे काढली. त्यानंतर त्या तरुणांनी अजगराला एका गोणीत बांधल्याचे व्हिडियोत दिसत आहे.