
>>योगेश चांदेकर । वाणगाव (डहाणू)
डहाणू तालुक्यातील सावटा घुंगरपाडा येथे सध्या चर्चा आहे की ती कोंबड्या खाण्यासाठी एका घरात शिरलेल्या अजगराची. घरात कोबंड्या ठेवलेल्या जागी अजगर शिरलेला पाहून घरातील सदस्यांनी बाहेर धूम ठोकली आणि गावकऱ्यांना मदतीला बोलावलं. अखेर त्या अजगराला जेरबंद करून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आलं. पण ‘श्रावणात’ कोंबडी खाण्यासाठी आला आणि सापडला, अशी गमतीशीर चर्चा आता रंगली आहे.
सावटा घुंगरपाडा गावातील सुरेश मोहन दुबळा यांच्या घरात सर्व कोंबड्या ओरडायला लागल्या कोंबड्या का ओरडत आहेत? हे पाहण्यासाठी सुरेश गेले असता त्यांना त्यांच्या घरात एक भला मोठा अजगर अंडी वर बसलेली कोंबडी खाताना दिसला त्यांनी लगेच घरातील लहान मुले व पत्नी यांना उठवले व घराच्या बाहेर नेले. त्यानंतर गावातील मंडळींना घरात अजगर शिरल्याचे सांगितले. गावकऱ्यांनी तात्काळ Wildlife conservation and animal welfare association चे सदस्य एरिक ताडवाला आणिु पूर्वेश तांडेल यांना बोलवाले. त्यांनी त्या अजगराला रात्री 02.15 वाजता पकडून डहाणू वन विभागाच्या ताब्यात दिले.
दरम्यान, या अजगराची लांबी जवळजवळ 12 ते 13 फुट आणि वजन 22 किलो आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

























































