
भुदरगड तालुक्यातील मठगाव येथील झाडांनाच क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. हे कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित झाडांची इत्थंभूत माहिती विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्यामुळे मुलांमध्ये पर्यावरणासंबंधी आवड निर्माण होत आहे.
मठगाव येथील श्रीमंत क्षात्र जगद्गुरू विद्यालय व मौनी गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्यूआर कोड जंगल’ हा अभ्यासाशी निगडित उपक्रम राबविण्यात आला. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये निसर्ग पर्यावरण संदर्भातील पाठ आहेत. त्यामुळे मुलांचा थेट जंगल आणि पर्यावरणाशी संबंध येऊन अरण्यभाषेची ओळख व्हावी, म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमामध्ये शाळा परिसरातील देशी जंगली झाडांवर क्यूआर कोड लावले आहेत. हा कोड स्कॅन केल्यास त्यामध्ये झाडाचे शास्त्र्ााrrय नाव, कुळ, विदेशी नाव, संस्कृत, मराठी, कन्नड, हिंदी, अशा विविध भाषांतील नावे आणि त्यांच्या औषधी गुणधर्मांची माहिती समोर येते.
सदरच्या उपक्रमास जंगल संशोधक दत्ता मोरसे यांचे सहकार्य आणि संस्थेचे संस्थापक संजय बेनाडीकर यांचे मार्गदर्शन मिळाले.































































