
सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात सोमवार, 15 ऑगस्टला रात्री 8 वाजता ‘उत्सव स्वातंत्र्याचा’ हा नेत्रदीपक सुश्राव्य कलाविष्कार सादर केला जाणार आहे. कविता, उतारा अभिवाचन अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेता राहुल मेहेंदळे करणार असून गायन अर्चना गोरे, ऋषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे, मंदार आपटे, नृत्य पूजा पंत आणि शिष्यागणा, संगीत संयोजन आनंद सहस्रबुद्धे तर संहिता आणि सुसंवाद विघ्नेश जोशी करणार आहेत. संकल्पना विनीत गोरे यांची असून संयोजन अर्चना गोरे यांचे आहे. कार्यक्रमाची विनामूल्य सन्मानिका उद्या सोमवार, 15 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजल्यापासून नाटय़गृहात उपलब्ध आहेत.


























































